वैयक्तिक व सामुहिक स्वास्थाची संकल्पना |
१.वैयक्तिक स्वास्थाची संकल्पना : वैयक्तिक स्वास्थाची संकल्पना :निरोगी जीवन जगण्याकरीता व आपले जीवन सुखी करण्याकरीता व्यक्तीने विचारपूर्वक व योजनापूर्वक आपल्या शरीरास व मनास लावुन घेतलेल्या चांगल्या सवयी म्हणजे वैयक्तिक स्वास्थ होय. |
२.बालकाची व वैयक्तिक परिस्थितीचा शारीरिक स्वास्थावर परिणाम : १.सकस आहार : दुध,लोणी,तुप,पालेभाज्या ,अंडी,मास असा सकस आहार मिळावा. २.रोग व साथीच्या रोगांपासुन संरक्षण : कांजण्या ,घटसर्प ,खरुज ,गजकर्ण ,धनुर्वात,इसब,एड्स,गर्मी इत्यादी रोगापासुन रक्षण व्हावे. ३.परिसर : शुध्द हवा,शुध्द पाणी,भरपूर सूर्यप्रकाश. ४.वैद्यकीय मदत : अंधश्रद्धेच्या आहारी न जाता वैद्यकीय मदत घ्यावी. ५.आर्थिक स्थिती : ज्या मुलांची आर्थिक स्थिती चांगली नसते त्यांना औषधी विकत घेता येत नाही त्यासाठी शाळेत वैद्यकीय तपासणी करणे. ६.सामाजिक स्थिती : समाजाला देव-देवता ,मंत्र तंत्र ,अंगारा –धुपारा काही नाही असे पटवून द्यावे. ७.रूढी,परंपरा अंधश्रद्धा दूर करावी. ८.शालेय वातावरण स्वच्छ् राखावे. ९.व्यायाम : शरीर वृध्दीसाठी व्यायाम करावयास हवा. |
३.सामुहिक स्वास्थाची संकल्पना व त्याचे प्रकार : सामुहिक स्वास्थाची संकल्पना : समाज अनेक व्यक्ती व्यक्ती मिळून बनला आहे.म्हणून समाज हा परिवर्तनाचा प्रेरक आहे. सामुहिक स्वास्थाचे प्रकार : १.नित्य समूह : शाळा ,कॉलेज,वस्तीगृहातील मुलांचा समूह. २.नैमित्तीक समूह: गारुड्याचा खेळ पाहण्यासाठी जमलेला समूह . |
४.सामुहिक स्वास्थाचा प्रदुषणावर होणारा परिणाम: |
५.वैयक्तिक स्वास्थ सामुहिक स्वास्थ यांचा संबंध : १.व्यक्ती –व्यक्ती मिळून समाज बनला आहे. २.व्यक्तिने स्वताच्या स्वास्थाचाच विचार करून चालणार नाही तर सामुहिक स्वास्थाचा विचार करावा. उदा-आपले घर ,स्वच्छ ठेवायचे म्हणून कचरा दुसऱ्याचा घरासमोर टाकणे हे आरोग्य आहे का? ३.एकमेका साह्यकरू अवघे धरू सुपंथ . ४.सामुहिक स्वास्थ हे वैयक्तिक स्वास्थातून आकारास येते. |
६.शारीरिक स्वास्थ व मानसिक स्वास्थ यांचा संबंध : १.शारीरिक स्वास्थ म्हणजे परीस्थीतिशी सुसंवाद होय. २.मानसिक स्वास्थ म्हणजे व्यक्तीला आपले नेहमीचे जीवन व सामाजिक व्यवहार कार्यक्षमतेने व सुखा समाधानाने आत्मविश्वासपूर्वक जगता येणे . ३.शारिरीक दुर्बलता,आजार यामुळे निकृष्ट मानसिक आरोग्य प्राप्त होते. ४.अपयशी भाव जीवनामुळे निकृष्ट शरीरयष्टी प्राप्त होते. ५.शरीर धड तर मन धड . उदा-एखाद्या सुंदर सिनेमा पाहत असतांना जर आपले डोके दुखत असेल तर आपण तो सिनेमा व्यवस्थित पाहू शकणार नाही. |
मुख्य पृष्ठ |