topics4

topics4
शारीरिक स्वास्थावर परिणाम करणारे घटक

१.शारीरिक स्वास्थावर परिणाम करणारे घटक :
१.आहार : अन्नामुळे जोम ,उत्साह वाढतो व शरीराची झीज भरून निघते.
२.व्यायाम : व्यक्तीची किमान क्षमता टिकविण्यासाठी व वाढवण्यासाठी व्यक्तीने विविध प्रकारे शारीरिक व्यायाम केले पाहिजे.
३.विश्रांती : विश्रांती म्हणजे झोप नव्हे.
४.परिसर : आपल्या सभोतालचा भाग म्हणजे परिसर होय.या परिसरात शुध्द हवा,पाणी ,प्रकाश मिळायला हवा.
५.संसर्ग : रोग प्रसाराच्या माध्यमातून अनेक रोग पसरतात सांसर्गिक रोगाची साथ आल्यास जनसंपर्क टाळावा.
६.आरोग्य शिक्षण : रोग कसे होतात व आपण त्यापासून कसे बचावे यासाठी आरोग्य शिक्षण द्यावे .
७.स्नायूची शक्ती : एखादी क्रिया करण्याची स्नायुची क्षमता म्हणजे स्नायुची शक्ती होय.
८.स्नायुचा दम : एखादी क्रिया विशिष्ट स्नायुचा दम करण्याची स्नायुची क्षमता म्हणजे स्नायुचा दम होय.
२.शारीरिक दोषाची करणे व त्यावर उपाय :
१.जन्मजात दोष .
२.बाळातपणाच्या वेळेचे दोष .
३.ग्रंथीच्या कार्यात बिघाड : शीर्षस्थ ग्रंथीच्या स्त्राववृद्धी शरीरास धिप्पाडपणा येतो .
४.अयोग्य परिसर .
५.अयोग्य प्रकाश .
६.सदोष आहार.
७.न्यूनगंड भीती: न्यूनगंड हा मानसिक दोषाचा बालकांच्या शरीर स्थितीवर परिणाम होऊन त्याला मानस कायिक विकार होतो.
८.अज्ञान .
९.अयोग्य शरीर स्थिती .
१०.वृद्धावस्था .
११.अपघात.
१२.अपंगत्व.

३.शालेय वैद्यकीय तपासणीची गरज व उद्देश :
शालेय वैद्यकीय तपासणीची गरज :
१.शाळेत मुळे ७ तास राहतात ऐकमेकाच्या संपर्कामुळे त्याचे आरोग्य बिघडण्याचे शक्यता असते.
२.पालकाच्या अज्ञानामुळे मुलामध्ये एखादा आजार तसाच राहण्याची शक्यता असते.
३.वैद्यकीय तपासणीमुळे पालक व बालकांत जागरुकता करता येते.
४.वैद्यकीय तपासणीमुळे शालेय परिसर निरोगी ठेवण्यात मदत होते.
५.विद्यार्थाचे वजन,उंची योग्य प्रकारे वाढत आहे का हे पाहता येते.
शालेय वैद्यकीय तपासणीचे उद्देश :
१.विद्यार्थांचे आरोग्याचे मुल्यमापन करणे.
२.विद्यार्थांच्या पालकांना कळवणे.
३.विद्यार्थांचा संसर्गजन्य व इतर रोगापासुन बचाव करणे.
४.विद्यार्थांना संतुलित आहार पुरविणे.
५.विद्यार्थांना सकस आहाराचे महत्व पटवून देणे.
६.विद्यार्थांना वैयक्तिक व सामुहिक सास्थाची संकल्पना पटवून देणे.
७.विद्यार्थांना आहार,स्वच्छता व सवयीचे महत्व पटवून देणे.
८.विद्यार्थांची प्रथम शालेय आरोग्य तपासणी बडोदा शहरात सुरु झाली होती.

४.शालेय वैद्यकीय तपासणीत तपासले गेले पाहिजे असे घटक :
१.स्थान : दलदली पासून दूर व उंच असावे.
२.शाळेची जागा : प्राथमिक शाळेसाठी १० एकर माध्यमिक शाळेसाठी ५ एकर जागा असावी शाळा दोन्ही बाजूंनी एल आकाराची असावी .
३.वर्ग खोल्या : वर्गासमोर व्हरांडा असावा विद्यार्थी संख्या ४० पर्यंत असावी व प्रत्येक मुलांना वर्गात १० स्केअर फुट जागा असावी .
४.फर्निचर : बाके व डेक्स लाकडी असावे.
५.उपहारगृह : संतुलित व पोषक आहार मिळावा.
६.स्वच्छतागृह : ६० मुलांसाठी १ मुतारी व १०० विद्यार्थांसाठी १ संडास मुलांन मुलींनसाठी स्वतंत्र संडास असावे.
७.पाणी पुरवठा : पाणी स्वच्छ करण्यासाठी पाण्यात जंतूनासके वापरावीत ब्लिचिंग पावडर,पोटाशिअमं परमगनेट टाकावे.
८.प्रथमोपचार सोय: छोट्या-मोठ्या अपघातावर उपचार करण्यासाठी शाळेत प्रथामपोचार ची सोय असावी.

५.अनुधावन कार्यात शिक्षकांची भूमिका :
अनुधावन :अनुधावन करणे म्हणजे योग्य पाठपुरावा करणे.
एखाद्या मुलामध्ये असणारे शारीरिक दोष ओळखून ते नाहीसे करण्यासाठी सतत प्रयत्न करणे .ते जोपर्यंत नाहीसे होत नाहीत तोपर्यंत उपाय योजना करीत राहणे त्यास अनुधावन कार्य म्हणतात.अनुधावन कार्यात शिक्षकांची भूमिका मोलाची असते.
६.आरोग्य दायक सवयीचे मुल्यमापन :
१.वैयक्तिक स्वच्छता राखणे: दैनंदिन पाहणी.
२.पोषाख.
३.हात रुमाल वापरणे.
४.मलमूत्र विसर्जन योग्य सवय असणे –प्रायोगी नोंदी .
५.उभे राहतांना बसतांना शरीराची योग्य ठेवण रोखणे.
६.श्वसन योग्य तारेने करणे: आत्मनिरीक्षण पध्दती वापर.
७.पिण्याचे पाणी ,अन्न चांगले ठेवणे.
८.रहदारीचे नियम पाळणे : प्रासंगिक नोंद.
९.पोहणे ,नौका विहरी,पर्वतारोहण यापासून बचाव.
१०.विस्तव ,वीज,पाणी यापासून बचाव.

७.प्रथमोपचार : (First Aid,जनक इसमार्च १८२३ ते १९०८ मध्ये )
प्रथोमपचार : प्रथोमपचार म्हणजे इजेवरचा पहिला इलाज होय.अपघाताच्या वेळी किंवा अकस्मात काही आजार उदभवल्यास रुग्णावर जो तातडीने इलाज केला जातो त्यास प्रथमोपचार म्हणतात.

प्रथामोपचारकाने रोगी हाताळण्याची पध्दती :
१.प्रथोमापचारका जवळ ज्ञान ,सहानुभूती व धैर्य व तीव्रनिर्णय शक्ती व साधन कुशल इत्यादी गुण हवे आहेत.
२. प्रथोमापचारकाने रूग्णाजवळील गर्दी हटवावी व निरीक्षण करावे.
३. प्रथोमापचारकाने प्रथम जखमेतून वाहणारे रक्त बंद करावे.
४. प्रथोमापचारकाने श्वास पाहावा व बंद असल्यास चालू करावा.
५. प्रथोमापचारकाने ताबडतोब घाव झाकावे व हाडतुटल्यास त्याला हलवू नये.

८.जखमाचे प्रकार :
१.कापलेली : चाकू ,सुरी,ब्लेड .
२.भुयारी: खिळा,सुई,काचाचे तुकडे.
३.फाटलेली: जनावराचे पंजे,यंत्रात बोट सापडणे.
४.चेंगरलेली: दारात बोट सापडणे,हातोडी खाली बोट येणे.
उपचार : घावाला डेटॉल च्या पाण्याने धुवावे नंतर डॉक्टर कडे जावे.
९.रक्त स्त्राव होत असल्यास उपचार :
१.केस वाहन्यातून रक्त स्त्राव होत असल्यास कापडाची पट्टी बांधावी.
२.स्पिरीट लावावे व जोराचा रक्तस्त्राव होत असल्यास रोग्याला निजवावे.
३.रक्त स्त्राव होणारा भाग उंच धरावा.
४.रक्त स्त्राव थांबे पर्यंत रोग्यांना चहा पाणी कॉफी असे उत्तेजक पेय देऊ नये.
१०.भाजणे व पोळणे :
१.कोरडी उष्णता : उन्ह,जाळ.
२.वीज :आकाशातील वीज.
३.घर्षण : भरभर फिरणाऱ्या तारेला स्पर्श.
४.भाजणारी रसायने :
आम्ल : सल्फुरिक व हाड्रक्लोरिक असिड .
अल्क : कॉस्टिक सोडा,कॉस्टिक पॉटयास .
५.पोळणे : म्हणजे ओल्या उष्णतेने भाजणे.
११.पाण्यात बुडाल्यास उपाय :
१.रोग्याच्या घशातील अडकलेले पदार्थ हळुवार काढणे.
२.रोग्याच्या अंगावरील कपडे सैल करावे.
३.रोग्याचे अंग थंड पडत असेल तर गरम कपडे गुंडाळावे.
४.कृत्रिम श्वासच्छ्वास करावा व नंतर शुद्धीवर आल्यास गरम उत्तेजक पेय म्हणून चहा द्यावे.
१२.बेशुध्दी किंवा भोवळ येण्याचे करणे:
१.अतिशय भूक लागल्यास .
२.दुषित वायू पोटात गेल्यास.
३.अतिश्रम झाल्यास.
४.विषबाधा झाल्यास.
५.रक्त स्त्राव झाल्यास.
१३.विषबाधाचे करणे:
१.श्वसनाद्वारे विषयारी वायू पोटात गेल्यास.
२.तोंडाद्वारेऔषध पिल्यास अथवा विषारी पदार्थ गिळल्यासं .
३.इंजेक्शन टोचल्यास .
४.कुत्राच्या चावल्यामुळे (हायड्रोफोबिया रोग होतो.)
१४.सर्पदंश झाल्यास उपाय :
१.विषारी साप असल्यस २.५ से.मी.दोन दाताचे वर्ण उमटतात.
२.दंशाच्या हद्याकडील भागाकडे घट्ट बांधावे.
३.दंशाच्या जागी पाउन इंच गोल जखम करून पोटाशींअम परमगनेट पूड टाकावी.
४.रोग्याला गिळता येत असेल तर चहा कॉफी द्यावी.
५.रोग्याचे मनोधर्य खचू नये व डॉक्टर कडून अंटीसिरमचे इंजेक्शन ताबडतोब द्यावे.
१५.अस्थीभंग व त्याचे प्रकार व त्यावर उपाय :
अस्थिभंग :
१.प्रत्यक्षमार : बाह्य वस्तूचा जोराचा आघात झाल्यामुळे त्याच जागी हाड मोडते.
२.अप्रत्यक्षमारा : जिथे मार बसला त्याच्या काही अंतरावर हाड मोडते.
३.स्नायू आखडणे : स्नायू एकाऐक खसकन खेचल्यामुळे हाड मोडते.
अस्थिभंग प्रकार :
१.साधा व बंद अस्थिभंग : यात शक्यतो जखम होत नाही.
२.उघडा अस्थिभंग : मोडकी हाडे कातडीच्या बाहेर येतात.
३.गुंतागुतीचा अस्थिभंग :हाड मोडल्यामुळे महत्वाच्या शरीरातील इंद्रियांना जखम होते.
४.तुकड्याचा अस्थिभंग : यात हाडाचे फार तुकडे होतात.
५.अडकलेला अस्थिभंग : हाडाची टोके एकमेकांत अडकतात .
६.चीराफळी अस्थिभंग : हाड न मोडता वाकते.
७.बसका अस्थिभंग : कवटीचा वरचा भाग आत जातो.
उपचार :
१.शक्यतो रुग्णास हानलवू नये.
२.प्रथम रक्तस्त्राव बंदोबस्त करावा.
३.आधार देऊन रुग्णाला ज्या स्थितीत आराम वाटेल त्या स्थितीत त्याला बसावे.
१६.सांधा निखळ्यास उपाय:
१.रोग्यास अधिक बरे वाटेल अशा स्थितीत ठेवावे.
२.दाबणे,रगडणे व सांधा जागेवर बसवण्याचा पर्यंत करू नये.
३.डॉक्टर ताबतोब दाखवावे.
१७.विजेचा धक्का बसल्यास उपाय :
१.वीजेचा प्रवाह बंद करणे.
२.रुग्णाला प्रवाह पासुन दूर करणे.
३.आवश्यक असल्यास कृत्रिम श्वसन चालू ठेवावे.
४.भाजल्याच्या जखमा असल्यास त्यावर इलाज करावा.
५.चिकटल्यानंतर आपण रुग्णाला डायरेक हात न लावता काठी किंवा रबरी मोजे याचा वापर करून रुग्णाला हात लावणे .
६.रुग्णाला पाण्यापासून दूर ठेवणे.
१८.प्रथमोचार पेटी (first Aids bos)
चाकू,कात्री,चिमटा ,कापूस व पट्ट्या ,साबण,पोटाशिम परमगनेट ,इत्यादी साधन प्रथमोचार पेटीत हवे आहे.हाड्रोजन परऑक्साईड लिक्विड हवे.
१९.लहान मुलांना होणारे संसर्गजन्य रोग :
१.कांजण्या :देवी प्रमाणे हा रोग आहे.
२.घटसर्फ : गळा सुजणे.
३.खरुज : किड्याची मादी आतडी खाली अंडी घालते.
४.गजकर्ण : खरुज पेक्षा अति महाभयंकर रोग आहे.
२०.रोग प्रसाराची माध्यमे :
१.हवेद्वारे पसणारे रोग :कांजण्या ,घटसर्फ .
२.संपर्कामुळे पसणारे रोग : खरुज ,गजकर्ण ,
३.अन्न व पाण्याद्वारे रोग : कॉलरा,हगवण.
४.किटक दंशामुळे पसरणारे रोग : मलेरिया ,प्लेग .
५.त्वचेद्वारे पसरणारे रोग : धनुर्वात ,इसब .
६.जानेंद्रिया द्वारे पसरणारे रोग : एडस ,गरमी .
२१.सांसर्गिक रोगाची साथ आल्यास आपण करावयाच्या गोष्टी :
१.सुचना देणे व गावात जंतुनाशके फवारणे.
२.रोग्यास अलग ठेवणे.
३.रोग जंतूचा नाश करणे.
४.लस टोचणे.
२२.गावामध्ये अमांशाची (अतिसाराची साथ सुरु झाल्यास उपाय :
१.ग्रामसफाई करावी.
२.पिण्याच्या पाण्यात क्लोरीन किंवा पोटशिअम परमगनेट टाकावे.
३.पाणी उकळून व गळून थंड करून घ्यावे.
४.जंतुनाशके फवारावी.
५.डॉक्टरकडून रोगाचा तोबडतोब इलाज करून घ्यावा.
मुख्य पृष्ठ