आरोग्य विषयक संघटनाची माहिती व कार्य |
१.जागतिक आरोग्य संघटनाची वैशिष्टे स्थापना १९४८ (who) १.सर्व लोकांना जास्तीत जास्त श्रेष्ठ आरोग्याची पातळी गाठता यावी म्हणून मदत करणे. २.ही संस्था स्वता हून संशोधन कार्य करत नाही .तर राष्ट्रीय अथवा खाजगी संस्थेकडून संशोधन चालते. ३.मदत माघीतल्यास मदत देते. |
२.युनिसेफ (UNICEF) स्थापना १९४६ तिची मदत : १.बालकाचे आरोग्य : भारताला बी.सी.जी.लस दिली . २.बालकाचा आहार : शेती सुधारण्यास पंजे दिली. ३.कुटुंब व बालकल्याण : करण्यासाठी धडपड . ४.शिक्षण : औपचारिक व अनौपचारिक शिक्षणासाठी सगळे साहित्य पुरविते. ५.युनिसेफ तर्फे GOBI कार्यक्रम अंमलात आणला जातो. ६.विभागीय कार्यालय -नवी दिल्ली मुख्या कार्यालय –न्यूयॉर्क . ३.नियोजन समितीच्या पंचवार्षिक योजनातील आवश्यक घटक : १.आरोग्य सेवा मिळावी असा विचार भोर कमिटीने १९४६ साली मांडला . २.प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थापना १९५८ मध्ये केली.त्याच्या मुलभूत विनामूल्य आरोग्य सेवा. १.सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य . २.माता व बालसंगोपन. ३.कुटुंब नियोजन. ४.वैद्यकीय सेवा. ५.आरोग्य शिक्षण. ६.जंतुविरहित पाण्याची व्यवस्था. ७.सांसर्गिक रोगांना आळा घालण्यासाठी लसी. ८.शालेय वैद्यकीय तपासणी. |
४.रेडक्रॉसची स्थापना व त्याचे कार्य: रेडक्रॉसची स्थापना १९१९ साली व भारतात १९२० साली झाली,कार्यालय जिनेव्हा येथे जीन हेनरी ज्युनानट . १.गरजुंना आर्थिक मदत करणे. २.पुरवठा कार्यालय वाहतूक व गुदामे . ३.आरोग्य रक्षण व समाज कल्याण करणे. ४.आपत्तींना तोंड देण्यास सज्ज राहणे. ५.युद्धकाळात . ६.शांतता काळात. |
५.रेडक्रॉसची मुख्या तत्वे : |
६.शालेय आरोग्य उपक्रमात सहभागी होणारे विविध विभाग : १.आरोग्य विभाग : २.शिक्षण विभाग : ३.ग्रामीण विकास विभाग : ४.एकात्मिक बालविकास संचलनालय : ५.भूजल सर्वेक्षण : ६.सामाजिक वनीकरण : |
७.आरोग्य विभागाचे स्तर: १.केंद्रियस्तर : २.राज्यस्तर : ३.जिल्लास्तर: |
८.महाराष्ट्र राज्य शिक्षण प्रशिक्षण परिषदेची कामे: |
९.ग्रामीण विकास विभाग : १.पोषण व बालविकास योजना . २.प्रशिक्षण . ३.पाणी पुरवठा. ४.ग्रामीण स्वच्छता . ५.लहान पाट बंधारे योजना. ६.बायोगस व सुधारित चुली . ७.अवर्षण ग्रस्त योजना. ८.राष्ट्रीय ग्रामीण विकास योजना . १.जवाहर लाल रोजगार योजना १ एप्रिल १९९८ साली. २.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम योजना. ३.ग्रामीण भूमिहीन रोजगार योजना. |
१०.एकात्मिक बालविकास संचालनालय स्थापना १९७८ रोजी २२ ऑगस्ट वैशिष्टे : १.आहार आणि आरोग्याचा दर्जा वाढविणे . २.शारीरिक,मानसिक ,सामाजिक विकास घडविणे. ३.माता व बालसंगोपन . ४.बालकाला सकस आहार मिळणे. |
११.भूजल सर्वेक्षण विभागाचे कार्य : १.जमिनीतील पाण्याची पातळी शोधून काढणे. २.पाणी मिळण्याचा अचूक अंदाज व्यक्त करणे. |
१२.सामाजिक वनीकराची गरज व उद्दिष्टे : १.जनतेच्या दैनंदिन गरजासाठी सरपण व इमारती साठी लाकूड उपलब्ध . २.अनेक उद्योगधंद्यासाठी कच्चा माल उपलब्ध करून देणे. ३.वातावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत . ४.पर्जन्यमान वाढते. ५.जमिनीची धुप थांबते. ६.भू-गर्भातील पाण्याचा साठा वाढतो. ७.पुराचा –धोका थांबतो. ८.डोंगरावरच्या झाडामुळे माती वाहून जात नाही त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी होते. |
१२.सामाजिक वनीकरणाच्या विशेष योजना : १.नगराचे वनीकरण : २.यात्रा स्थळांचा विकास : ३.स्मृती उद्यान : ४.पाणलोट क्षेत्रात वनीकरण : ५.वृक्ष लागवड व कुरण विकास : |
१३.शालेय आरोग्य विषयक स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या संस्था : १.नगर पालिका : २.ग्राम पंचायतीची स्थापना १९६२ . ३.रोटरी क्लब पॉल हरीस अमेरिका १९०५. भारतात १९१९ मध्ये मुख्य कार्यालय : शिकागो येथे. ४.लॉयन्स क्लब मेल्विन ज्युन्स . |
१४.नगर पालिकांचे कामे: १.नगर पालिका गावात १० हजार पेक्षा अधिक लोक संख्या असल्यास स्थापना करतात . २.सामाजिक गरजा व समस्या सोडवणे. ३.सार्वजनिक मनोरंजनासाठी क्रीडांगणे व वाचनालयाची उपलब्धता करून देणे. ४.नगर पालिकेचे आवश्यक कर्तव्य व ऐच्छिक कर्तव्य आहेत.जे ग्रामपंचायत प्रमाणे होतात. |
१५.ग्राम पंचायतची कामे :(स्थापना १९६२ साली ) १.गावातील लोकांच्या आरोग्याची निगा . २.स्वच्छता व सफाई कडे लक्ष देणे . ३.सडका ,धर्म शाळा,पाणी पुरवठा इत्यादी व्यवस्था करणे. ४.जन्म मृत्यू च्या आणि विवाहाच्या नोंदी ठेवणे. |
१६.रोटरी क्लबची कामे : १.समाजऋण फेडण्यासाठी रोटरी क्लब मार्फत काम करणे. २.माणसाने नेहमी उच्च मूल्यावर श्रद्धा ठेवावी व श्रद्धा युक्त अंतकरणाने उत्तम कार्य करत राहावे . ३.समाजाचा परिचय करून घेऊन समाज कार्य करणे. ४.समाजाच्या समस्या लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण आपल्या परीने उपाय योजना करणे. |
१७.लॉयन्स क्लब : १.सामाजिक कर्तव्याच्या भूमिकेतून निर्माण झालेली संस्था होय. २.we serve,आम्ही सेवा करतो या संस्थेचे वाक्य आहे. ३.पैसा ,वेळ ,श्रम,यांना ज्याची गरज आहे.त्यांना मदत करणे. ४.स्त्री व पुरुष कोणीही या संस्थे मार्फत काम करू शकते . ५.आरोग्य शिबीरे . ६.गरजुंना मदत करणे. ७.शिवणयंत्रासारखे साहित्य पुरविणे. ८.निधी गोळा करणे व इत्यादी कामे ही संस्था करते. |
१८.रक्त पेढी व तिची आवश्यकता : ( लाडस्टीनर चा ससा ) १.एखाद्या ठिकाणी विविध गटांचे रक्त योग्य रितीने साठवून ठेवले जाते व आवश्यकतेनुसार गरजूना पुरविले जाते. ती संस्था म्हणजे रक्त पेढी होय. २.प्रसुती मध्ये काही वेळा रक्त जाते तेव्हा रक्त पुरविले जाते. ३.रुग्णाला योग्य गटाचे रक्त मिळणे कधी –कधी अश्यक असते त्यासाठी रक्त पेढीतील साधावलेले रक्त दिले जाते. ४.रक्त दान करतांना रक्तदात्याचे रक्ता मधील हिमोग्लोबिन १३ टक्केचे वर असावे. |
मुख्य पृष्ठ |