topics6

topics6
आरोग्य शिक्षकाची भूमिका

1. शिक्षक हा माळी आहे ही भुमिका तुम्ही कशी कराल :
१.माळ्यां कडून रोपट्याची निगे प्रमाणे .
२.शिक्षक व माळी एकच आहे.
३.शिक्षक बालकाच्या वाढ व विकासाचे शिक्षण देतो .
४.मळ्यां प्रमाणे शिक्षक विद्यार्थांचे संवर्धन करतो.
५.फ्रोबेल याने शिक्षकांना माळी म्हटले आहे.

2. राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान मोहीम .
सध्याचे जीवन अत्यंत धकाधकीचे आहे,महाराष्ट्र राज्यातील मुंबई,ठाणे,नाशिक,औरंगाबाद,कोल्हापूर,नागपूर हे विभाग औद्योगिक दृष्ट्या दिवसेंदिवस विकसित होत आहेत.तसे अपघातांचे प्रमाण वाढत आहे.मोठ्या शास्त्रक्रिया ,अपघात ,बाळंतपणातील रक्तस्त्राव ,थामेसेमिया,हिमोफिलिया व सिकलसेकलसारखे आजार यासाठी मोठ्या प्रमाणावर आवश्यक भासते,त्यांना तातडीने रक्तपुरवठा झाल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात.अशावेळी नियमित रक्तदान करणारे स्वयंस्फुर्त रक्तदान उपलब्ध होणे गरजेचे आहे.
रक्तदानाबद्दल असणारे गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने खालील माहिती उपयोगी ठरणार आहे.आपणांस विनंती की रचनात्मक कार्य,सर्वधर्मसमभाव,बंधुत्व,राष्ट्रीय एकात्मता,प्रत्यक्ष जीवदानाचे पुण्य आणि आत्मसमाधान या सर्व गोष्टींना सहज साध्य करणाऱ्या शासनाच्या स्वैच्छिक रक्तदान मोहिमेत सहभागी होऊन राज्यात १०० टक्के स्वैच्छिक रक्त संकलन करण्यास मदत करा.
१.रक्तदान का करावे ?: माणसाला फक्त माणसाचेच रक्त चालते.रक्तदान केल्याने रुग्णाचा जीव वाचण्यास निश्चित मदत होते .रक्तदान करणाऱ्याला कोणतेही शारीरिक नुकसान नाही.रक्तदान हे सामाजिक कर्तव्य आहे.
२.रक्तदान देण्यास व्यक्ती योग्य आहे हे कसे समजावे ? :
१.पूर्ण वैद्यकीय तपासणी करूनच तुम्ही रक्त देण्यासाठी योग्य की अयोग्य हे ठरविले जाते.
२.तुमचे वय १८ पेक्षा जास्त व ६० पेक्षा कमी असेल व वजन ४५ किलोच्या वर असणे आवश्यक आहे.
३.रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२ ग्रामच्या वर असेल तरच तुमचे रक्त घेतले जाते.

३.रक्तदान केल्यानंतर अशक्तपणा येईल का ? : मुळीच नाही .तुमच्या शरीरात एकूण ५ ते ६ लिटर्स रक्त असते .त्यापैकी फक्त ३५० सी.सी.म्हणजे केवळ पाचच टक्के रक्त तुम्ही देता दिलेले रक्त २४ तासात शरीर पुन्हा तयार करते .रक्तदान केल्यांनतर दैनंदिन काम करू शकता.यासाठी विश्रांती घेण्याची आवश्यकता नाही.
४.रक्त दिल्यामुळे काय फायदा ? : कोणतेही दान हे एक पुण्यकर्म आहे.रक्तदान हे तर सर्वात श्रेष्ठदान ,कारण त्यामुळे आपण एखाद्याचा जीव वाचवतो.हे समाधान आपण अनुभवानेच घेऊ शकाल.
५.किती वेळा रक्त देता येते ? : तीन महिन्यातुन एकदा रक्तदान करू शकता.येताना तुम्हच्या मित्रांना ही बरोबर आणा .रक्तदानामुळे एडस किंवा कावीळ होईल का ? कदापिही नाही .रक्त गोळा करताना निर्जंतुक साधनांचाच वापर केला जातो.रक्त देणाऱ्यास कोणताही धोका नसतो.
६.रक्तगट कोणता आहे हे कसे समजावे ? : सर्वांचे रक्त सारखेच असते का ? नाही ,रक्ताचे ए,बी,एबी व ओ असे चार गट असतात.या चारही रक्तगटास आर.एच.पॉझिटीव्ह किंवा आर.एच निगेटिव्ह असे दोन उपगट असतात.भारतातील फक्त ५ टक्के लोक आर.एच .निगेटिव्ह आहेत.कोणत्याही गटातील व्यक्तीला रक्ताची गरज भासू शकते.त्यामुळे सर्वच प्रकारच्या व्यक्तींना रक्तदान केले पाहिजे .तुमचा रक्तगट जर आर.एच.निगेटिव्ह असेल तर एखाद्या रक्तपेढीत तुमचे नव नोंदवून ठेवा .
७.स्वतचे रक्त स्वत:साठी वापरता येते हे खरे आहे का ? : होय,ही बाब १०० टक्के खरी आहे.ज्या व्यक्तीची शस्त्रक्रिया पूर्वनियोजित असते व जी व्यक्ती या आजार व्यक्तीरिक्त स्वस्थ असते.त्यांसाठी स्वत:चे रक्त स्वत:साठी वापरता येते.
८.स्वत:चे रक्त स्वत:साठी वापरण्याचे फायदे कोणते ? :
१.ऐनवेळी धावपळ करण्याची गरज नसते .
२.रिअक्शन होण्याची शक्यता नसते.
३.स्वत:चे रक्त अत्यंतसुरक्षित असते.
९.रक्तापासून कोणते रक्तघटक तयार करता येतात?
रक्ताचे मुख्य दोन घटक आहेत.
१.रक्तपेशी : रक्तपेशी तीन प्रकारच्या असतात.
१.लाल पेशी, २.पांढऱ्या पेशी , ३.प्लेटलेटस पेशी यापैकी आपल्या देशात लाल रक्त पेशी व प्लेटलेटस पेशी वेगळ्या केल्या जातात.
२.प्लाझ्मा : प्लाझ्मापासून
१.सिंगल डोनर प्लाझ्मा, २.फ्रेश डोनर प्लाझ्मा, ३.क्रायोप्रेसीपिटेट तयार करण्यात येतात.
१०.रक्त घटकांचे फायदे कोणते ? :एखाद्या आजारासाठी विशिष्ठ रक्तघटक लागतो.अशावेळी आवश्यक घटक देता येतो व इतर अनावश्यक घटक देण्याचे टाळता येते .त्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळले जातात.
आटत नसतो रक्ताचा झरा !
दर तीन महिन्याने रक्तदान करा !! धन्यवाद !!



मुख्य पृष्ठ